🕒 1 min read
बॉलिवूडमध्ये कधी कुणाचं सुत जुळेल आणि कधी कोण अचानक बोहल्यावर चढेल, याचा काहीच नेम नाही. आता याच यादीत आणखी एका मोठ्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय का? असा प्रश्न विचारला जातोय.
बॉलिवूडची ‘क्वीन’ आणि आता भाजपची खासदार असलेली कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होतोय, ज्याने थेट तिच्या लग्नाच्याच चर्चांना उधाण आणलंय.
Kangana Ranaut Viral Video
या व्हायरल व्हिडीओमध्ये कंगना एका घराबाहेर पडून तिच्या गाडीकडे जाताना दिसतेय. पण लक्ष वेधून घेतलंय ते तिच्या लूकने! फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस, कपाळावर टिकली, हातात हिरव्या बांगड्या आणि चक्क गळ्यात मंगळसूत्र असा तिचा अवतार दिसतोय. पापाराझींना पाहूनही ती काहीच न बोलता थेट निघून गेल्याने सस्पेन्स आणखी वाढलाय.
हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केलीये. एका युझरने थेट विचारलं, “मंगळसूत्र? कंगना हिचं लग्न झालं का?” तर काहींनी ‘नवरा मुलगा कोण?’ असा सवाल केलाय. यामुळे कंगनाने खरंच गुपचूप संसार थाटलाय की काय? अशी खळबळ उडाली आहे.
पण या सगळ्या चर्चांवर आता एक वेगळीच माहिती समोर येत आहे. सूत्रांनुसार, कंगनाने कोणतंही लग्न केलेलं नसून हा व्हिडीओ तिच्या आगामी ‘तनू वेड्स मनू ३’ (Tanu Weds Manu 3) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा असू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
राजकारणात धडाकेबाज एन्ट्री घेतल्यानंतर आता कंगना पुन्हा एकदा सिनेसृष्टीत सक्रिय झाली आहे. २०२४ मध्ये मंडीतून खासदार झालेल्या कंगनाकडे सध्या ‘क्वीन २’ सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. आता हा व्हायरल व्हिडीओ खऱ्या लग्नाचा आहे की सिनेमाचा? हे कंगनाच सांगू शकेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोदी-मेलोनी यांच्यातली ‘ती’ गोष्ट सोनाक्षी-झहीरच्या घरात; कॅमेऱ्यासमोर अचानक खिशातून काढली अन्…
- अंशुमन विचारेची मोठी झेप; मुंबईत तिसरं घर घेतल्यानंतर आता दारात आली ‘ही’ लक्झरी कार!
- पावसाचा अंदाज, खरीप हंगामावर ‘एल निनो’चं सावट; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












