Share

विजयानंतर सूर्यकुमार यादव भावूक, संजू सॅमसनबाबत म्हणाला असं काही की…

टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव भावूक झाला. संजू सॅमसनचे कौतुक करत त्याने ५ मार्चला मुंबईत होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलचा प्लॅन सांगितला.

Published On: 

Suryakumar Yadav on IND vs PAK

IND vs ENG | क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल सांगता येत नाही, पण जेव्हा विजयाचा आनंद अश्रूंतून बाहेर येतो, तेव्हा तो क्षण खासच असतो. कालच्या थरारक विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार Suryakumar Yadav चांगलाच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हा सामना एका अर्थाने आमच्यासाठी ‘क्वार्टर फायनल’च होता, आणि मुलांनी जी जिद्द दाखवली ती कौतुकास्पद होती, असं सूर्याने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

या विजयाचा खरा हिरो ठरलेल्या संजू सॅमसनचं सूर्याने तोंडभरून कौतुक केलंय. “जे वाट पाहतात अशा चांगल्या माणसांसोबत शेवटी चांगलंच घडतं,” असा मोठा गौप्यस्फोट करत सूर्याने संजूच्या संघर्षाला सलाम केला. संजू जेव्हा संघात नव्हता, तेव्हा त्याने घेतलेल्या मेहनतीचं हे फळ असल्याचं सूर्याने आवर्जून सांगितलं.

Suryakumar Yadav emotional on Sanju Samson

दुसरीकडे, खेळपट्टीवर दव (Dew factor) असल्याचा मोठा फायदा फलंदाजांना झाला. त्यामुळेच २०० धावांचं टार्गेट गाठणं सहज शक्य आहे, याची संघाला खात्री होती. आमचा प्लॅन स्पष्ट होता, सामना जास्तीत जास्त शेवटपर्यंत (Deep) न्यायचा. त्यामुळेच रणनीतीनुसार गोलंदाजांनीही अगदी अचूक मारा केल्याचं सूर्याने स्पष्ट केलं.

मैदानावर दडपण असतंच, अगदी ‘पोटात गोळाही येतो’, पण तुम्ही ते दडपण कसं हाताळता यावर सगळं अवलंबून असतं, असं सूर्या म्हणाला. पहिल्या सामन्यापासूनच्या कामगिरीमुळे आपण मुंबईतील सेमीफायनलसाठी हक्काने पात्र आहोत, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. आता टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली असून, वानखेडेवर इंग्लंडचा कसा धुव्वा उडवते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही