Share

Team India चा ऐतिहासिक विक्रम, वेस्ट इंडिजला चारली धूळ; घडवला नवा इतिहास!

टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध १९६ धावांचा पाठलाग करत भारताचा आजवरचा सर्वात मोठा यशस्वी रनचेस करण्याचा नवा इतिहास रचला आहे.

Published On: 

ind vs wi team india | ind vs nz

Team India | क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता विक्रम मोडेल, हे अजिबात सांगता येत नाही. पण आज टीम इंडियाने जे करून दाखवलंय, त्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

आजच्या IND vs WI Live सामन्यात भारताने केवळ वेस्ट इंडिजचा पराभव केला नाही, तर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. हा विजय साधासुधा नाहीये, तर तो भारताचा विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी ‘रनचेस’ ठरला आहे.

त्यामुळेच आता सर्वत्र भारतीय फलंदाजांचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण टी-२० विश्वचषकाच्या इतिहासाचा विचार केला, तर हा तिसरा सर्वात मोठा यशस्वी रनचेस ठरला आहे. या विक्रमी यादीत आता टीम इंडियाने अगदी दिमाखात एन्ट्री मारली आहे.

याआधीचे विक्रम कुणाच्या नावावर आहेत?

तर २०१६ च्या विश्वचषकात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तब्बल २३० धावांचे महाकाय लक्ष्य यशस्वीपणे गाठले होते. दुसरीकडे, २००७ च्या पहिल्याच विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला धूळ चारताना २०६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता याच दिग्गजांच्या यादीत भारताने आपलं नाव कोरलं आहे.

आजच्या सामन्यात १९६ धावांचे कठीण आव्हान टीम इंडियाने अतिशय सहज पार केले. या ऐतिहासिक विजयामुळे भारताने आपली खरी ताकद पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. आता चर्चा अशी आहे की, या फॉर्ममुळे भारतीय संघ इतर सर्व संघांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install