Share

गौतमी पाटीलला नवरा कसा हवा? लग्नासाठी ठेवली मोठी अट; पहिल्यांदाच बोलली लाइफ पार्टनर विषयी

गौतमी पाटीलने आपल्या लग्नाच्या आणि जोडीदाराच्या अपेक्षांवर मौन सोडलं आहे. “भूतकाळ स्वीकारणारा हवा,” असं म्हणत तिने मोठी अट घातली आहे.

Published On: 

Gautami Patil Valentine: जोडीदाराबद्दल गौतमीची पहिली अट!

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या नावाची चर्चा असते, ती म्हणजे ‘सबसे कातील’ गौतमी पाटील (Gautami Patil). तिचं नाव काढलं तरी तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. लावणीच्या ठेक्यावर लाखो दिलांची धडकन बनलेली गौतमी आज कुणाची तरी ‘व्हॅलेंटाईन’ (Valentine) आहे का? हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच सतावतो. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने खुद्द गौतमीनेच यावरचा पडदा उचलला असून, आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आज सगळीकडे प्रेमाचे वारे वाहत असताना, गौतमीने आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्या. तिला जेव्हा विचारण्यात आलं की यंदा तुझा व्हॅलेंटाईन कोण? तेव्हा तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं, “सध्या माझा कोणीही व्हॅलेंटाईन नाही. माझे कार्यक्रम आणि काम यातच मी व्यस्त आहे. मला यात फारसा इंटरेस्ट नाही.” तिच्या या उत्तराने अनेकांचा हिरमोड झाला असेल, पण तिने करिअरला पहिलं प्राधान्य दिलंय हे नक्की.

Gautami Patil Valentine

गौतमीला जोडीदार कसा हवाय, यावर ती जे काही बोलली त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गौतमी म्हणाली, “माझा पार्टनर हा अत्यंत समजूतदार असावा. माझ्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे माझा भूतकाळ (Past) स्वीकारणारा आणि मला समजून घेणारा जोडीदार मला हवाय. हीच माझी मुख्य अपेक्षा आहे.” गौतमीच्या या वक्तव्यावरून तिला असा जोडीदार हवाय जो तिच्या वादात आणि प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन तिला माणूस म्हणून स्वीकारेल.

प्रेमाची व्याख्या करताना तिने महागड्या गिफ्ट्सपेक्षा ‘वेळेला’ महत्त्व दिलं. “एकत्र छान जेवण करणं आणि एकमेकांना वेळ देणं, हेच खरं सेलिब्रेशन आहे,” असं साधेपणाने सांगत तिने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही