Share

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण; म्हणाली, “मुंबईत असताना…”

लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मुंबई सोडून अलिबागला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील तिने दिलेलं कारण वाचून तुम्हालाही कौतुक वाटेल.

Published On: 

Prarthana Behere Home: मुंबई सोडून अलिबागला का गेली?

चकचकीत लाइमलाईट आणि मुंबईची (Mumbai) धावपळ कोणाला नको असते? पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीने चक्क मुंबईवर पाणी सोडलंय. तिने घेतलेला हा निर्णय आणि त्यामागचं कारण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) मुंबई सोडून अलिबाग गाठलं आहे.

नेहमी शूटिंग आणि इव्हेंट्समध्ये व्यस्त असणाऱ्या प्रार्थनाने हा टोकाचा निर्णय का घेतला? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यावर मनमोकळा संवाद साधला. ती आणि तिचे पती अभिषेक जावकर आता अलिबागला शिफ्ट झाले आहेत. यामागे एक खास आणि हृदयस्पर्शी कारण आहे. प्रार्थना म्हणाली, “सध्या माझ्या घरी तब्बल १२ श्वान (Dogs) आहेत. त्यांच्यासोबत वेळ घालवणं मला प्रचंड आवडतं.”

Prarthana Behere Shifted To Alibaug

तिने पुढे सांगितलं की, अलिबागच्या फार्महाऊसवर ती एक सेलिब्रिटी नसून, त्या १२ श्वानांची ‘आई’ असते. “तिथे मी माझं आयुष्य शांतपणे जगते. मला असंच निवांत लाईफ हवं होतं,” अशी कबुली तिने दिली. कोरोना काळाने (Covid) तिच्या विचारसरणीत मोठा बदल घडवला. “आपण जगणं विसरता कामा नये, हे मला त्या काळात उमजलं,” असं ती म्हणते.

मुंबईत असताना पती अभिषेक सकाळी ८ ला बाहेर पडायचा आणि थेट रात्री १२ ला घरी यायचा. दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता. म्हणूनच त्यांनी आता ‘Work-Life Balance’ साधला आहे. कामासाठी ४ दिवस मुंबईत आणि उरलेले ३ दिवस अलिबागच्या निसर्गरम्य वातावरणात, असा त्यांचा नवीन दिनक्रम सुरू आहे. प्रार्थनाचा हा साधेपणा चाहत्यांना भलताच भावलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही