Share

‘पुढच्या पिढीचं काय होणार?’; लग्नाबद्दल बोलताना प्रियदर्शनीने मांडलं ‘भयाण’ वास्तव

सोशल मीडियामुळे नाती कशी बिघडत आहेत आणि लग्नाचा निर्णय घेणं का कठीण झालंय, यावर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने भाष्य केलं आहे.

Published On: 

Priyadarshini Indalkar on Marriage: लग्नाबद्दल प्रियदर्शनीचं मोठं विधान!

सोशल मीडियाच्या (Social Media) जमान्यात ‘प्रेम’ म्हणजे नक्की काय? हा प्रश्न सध्याच्या तरुणाईला सतावतोय आणि याचंच टेन्शन आता आपल्या लाडक्या अभिनेत्रीलाही आलंय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिने लग्नाबाबत आणि आजकालच्या नात्यांबद्दल केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. तिने मांडलेलं वास्तव वाचून अनेकांना स्वतःच्याच आयुष्याचा आरसा पाहिल्यासारखं वाटेल.

एका मुलाखतीत प्रियदर्शनीने आजच्या पिढीची द्विधा मनस्थिती अगदी रोखठोक शब्दांत मांडली. ती म्हणते, सोशल मीडियावर आपल्याला रोज १० वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. “कधी वाटतं प्रेमच सर्वकाही आहे, तर कधी वाटतं प्रेमात पडू नका, करिअर महत्त्वाचं आहे.” यामुळे नेमकं काय करावं, हेच कळत नाही आणि आपलं ब्रेन रॉटिंग (Brain Rotting) सुरू होतं. खोट्या जगात वावरताना लग्नाचा एवढा मोठा निर्णय घेणं आता सोपं राहिलेलं नाही, असं तिचं म्हणणं आहे.

Priyadarshini Indalkar on Marriage

घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर बोट ठेवताना तिने एक धक्कादायक निरीक्षण नोंदवलं. ती म्हणाली, “सध्या जर तुम्ही वयाची तिशी ओलांडली असेल आणि अजूनही अविवाहित असाल, तर तुम्ही एक घटस्फोट चुकवलाय, असं म्हटलं जातं.” कारण पंचविशीत लग्न आणि तिशीत काडीमोड, हे प्रमाण भयानक रित्या वाढलंय.

एकीकडे ही भीती असली तरी, “मला लग्न नक्कीच करायचंय, मी अजूनही प्रेमाबाबत आशावादी आहे,” असंही तिने स्पष्ट केलंय. पण सध्यातरी ‘शिवाली’ म्हणजेच प्रियदर्शनी या परिस्थितीमुळे प्रचंड कन्फ्युज आहे, हे मात्र नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही