Share

“फक्त मुंब्रा कशाला, अख्खा हिंदुस्थान ‘हिरवा’ करा!”; अभिजीत केळकरचा MIM नगरसेविकेला टोला

अभिजीत केळकरने MIM नगरसेविकेच्या ‘मुंब्रा हिरवा’ करण्याच्या वक्तव्याचा समाचार घेत, ‘संपूर्ण हिंदुस्थान हिरवं करा’ असा सल्ला दिलाय, पण एका वेगळ्या अर्थाने!

Published On: 

Abhijeet Kelkar Video: MIM च्या 'त्या' वक्तव्यावर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर!

🕒 1 min read

राजकीय विजयानंतर हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर कसं आणायचं आणि शब्दांचे खेळ शब्दांनीच कसे परतवून लावायचे, हे मराठी कलाकारांना नेमकं जमतं. ठाण्यात एमआयएमच्या (AIMIM) विजयानंतर ‘मुंब्रा हिरवा’ करण्याच्या वक्तव्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादात आता अभिनेता अभिजीत केळकरने (Abhijeet Kelkar) उडी घेतली असून, त्याने दिलेल्या एका उत्तराने सध्या सोशल मीडियावर ‘खळबळ’ उडाली आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. विजयाच्या जल्लोषात त्या म्हणाल्या होत्या की, “कैसे हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है.” त्यांच्या या ‘हिरवा’ करण्याच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला गेल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनीही यावर कडक शब्दांत समाचार घेतला होता.

Abhijeet Kelkar Video

अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतो. त्याने या वादावर एक भन्नाट विडिओ (Video) शेअर केला आहे, ज्यात तो चक्क बागकाम करताना दिसतोय. हातात रोप आणि माती घेऊन त्याने नगरसेविकेच्या वक्तव्याचा ‘अर्थ’च बदलून टाकला.

अभिजीत व्हिडिओमध्ये म्हणतो, “हरा कर दिया ना.. अरे मी तर म्हणतो फक्त मुंब्रा नाही, संपूर्ण हिंदुस्थान हिरवं करा. काय ताई..? नाही कळलं? अहो, आमच्यात पण हिरवं करतात… पण ते तसं नाही, असं..” हे बोलताना त्याने संत तुकारामांचा “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा दाखला देत निसर्गप्रेमाचा संदेश दिला.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव अभिजीतने राजकीय रंगाचा विषय पर्यावरणाकडे (Environment) वळवल्याने नेटकरी भलतेच खुश झाले आहेत. “झाडे लावा, झाडे जगवा” असा हॅशटॅग वापरत त्याने दिलेल्या या उत्तरावर ‘जय महाराष्ट्र’, ‘मस्त चपराक दिली’ अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. त्याची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही