पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलेलं असतानाच, आता हगवणे कुटुंबाशी संबंधित चौंधे कुटुंबावर सूनेने केलेले धक्कादायक आरोप समोर आले आहेत. पीडित सूनेने सांगितले की, तिचा नवरा ( Suyash Chondhe ) ब्लू फिल्म दाखवत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवायचा, सासू काळी जादू करत होती, तर दीर आणि नवरा सासूसमोरच गांजा पित असत.
Suyash Chondhe’s Wife Accuses Husband of Abuse
विवाहितेने तिच्या पती सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरा नरेश चौंधे आणि सासू वैशाली चौंधे यांच्यावर २० लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. तिला वारंवार मारहाण, मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
महिला आयोग आणि पोलिस दुर्लक्ष
पीडित सूनेने जानेवारी २०२५ मध्ये खडक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती आणि फेब्रुवारीमध्ये राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र, महिला आयोगाने कोणतीही कारवाई न करता तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, असा सूनेने आरोप केला आहे. या प्रकरणात दुर्लक्ष केल्याने रुपाली चाकणकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा राज्य महिला आयोगाने ( Rupali Chakankar ) या प्रकरणातही निष्क्रियता दाखवल्याचं समोर आलं आहे.
थार गाडीचा धागा – हगवणे प्रकरणाशी संबंध
विशेष म्हणजे, चौंधे कुटुंबातील संकेत चौंधे याच्या नावावरची थार गाडी वापरूनच वैष्णवी प्रकरणातील आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार होते. त्यामुळे चौंधे आणि हगवणे कुटुंबातील संबंधांची नाळ आणखी घट्ट असल्याचे संकेत मिळत आहेत.
पीडित सूनेने सांगितलं की, “माझ्या आणि माझ्या मुलीच्या न्यायासाठी मी शेवटपर्यंत लढेन”. पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि महिला आयोगानेही तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पीडित सूनेने केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “सासू करते काळी जादू!” – विवाहितेचा धक्कादायक आरोप, आत्महत्येचा प्रयत्न, हगवणे कनेक्शन पुन्हा चर्चेत
- आणखी एक विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, ‘हगवणे कनेक्शन’ पुन्हा चर्चेत
- भाजप नेत्याचे हायवेवर गर्लफ्रेंडसोबत अश्लील गैरकृत्य; शिक्षा मात्र देखरेख करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांना!













