Share

Sanjay Raut | तुमचे आश्वासनाचे फुलबाजे विझले का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

🕒 1 min readSanjay Raut | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे. आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरी मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहे.Related News for Youजयंत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे.

आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषण मागे घेतलं असलं तरी मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम आहे.

एक महिना ते उपोषण स्थळीत राहणार आहे. एक महिन्यानंतर आंदोलन मागे घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

There is no relationship of trust with the state government – Sanjay Raut

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “राज्य सरकारसोबत विश्वासाचं नातं  राहिलेलं नाही.

पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठी आश्वासन दिली होती. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर 24 तासात मराठ्यांना आरक्षण देऊ, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मग ते आता मराठ्यांना आरक्षण का देत नाही? मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. कारण राज्य सरकारवर कुणी विश्वास ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी नुसते आश्वासनाचे फुलबाजी उडवलेले आहेत. त्यांचे ते फुलबाजी आता विझले का?”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी आपले प्राण पणाला लावले आहे. मात्र, सरकार त्यांच्यावर उपोषण मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे. कारण 16 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक आहे.

त्या बैठकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, म्हणून सरकारचं जरांगे यांना गुंडाळण्याचं काम सुरू आहे. मात्र, मनोज जरांगे गुंडाळले जाणार नाही, हे मी वारंवार सांगत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!