Share

Eknath Shinde | मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकार काम करतंय – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार आणि लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागण्यांवर सरकार काम करत असल्याचं एकनाथ … Read more

Published On: 

Eknath Shinde | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार आणि लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या घटनेनंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मागण्यांवर सरकार काम करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Maratha society is very disciplined – Eknath Shinde

पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे.

त्याचबरोबर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी मी स्वतः संवाद साधला आहे. तुमच्या या आंदोलनावर सरकार काम करत आहे, असं मी जरांगे यांना सांगितलं आहे.

गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांना मी जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं. आतापर्यंत मराठा समाजानं अनेक आंदोलन केले आहे. ही सर्व आंदोलनं आपण पाहिली आहेत. मराठा समाजाचे हे मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेले आहे.

मराठा समाज हा अत्यंत शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय आहे. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून काही लोक राज्यामध्ये शांतता बिघडवण्याचं काम करत आहे.

त्याचबरोबर काही लोक राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. त्या लोकांपासून मराठा समाजानं सावध राहिलं पाहिजे.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घटनास्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

इतर अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले होते. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं ते त्यांना म्हणत होते. परंतु, शेवटी त्यांच्या जीवाची काळजी सरकारला आहे.

जालना जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडला त्याबाबत आम्हाला खंत आहे. कारण आपलं सरकार संवेदनशील आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय देणारं आपलं सरकार आहे. गेल्या वर्षभरात सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही