Share

Raj Thackeray | लाठी चार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली पाहिजे – राज ठाकरे

🕒 1 min read Raj Thackeray | जालना: गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज घटनास्थळी दाखल झाले आहे. लाठी चार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | जालना: गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे.

या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज घटनास्थळी दाखल झाले आहे. लाठी चार्ज करणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

I am going to discuss the subject with Eknath Shinde – Raj Thackeray 

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “ज्या लोकांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केला, ज्या लोकांनी पोलिसांना आंदोलकांवर गोळ्या झाडायला लावल्या, त्या सर्व लोकांना तुम्ही सर्वप्रथम मराठवाडा बंदी करायला पाहिजे.

त्या लोकांना मराठवाड्यामध्ये पाऊल ठेवून देऊ नका. जोपर्यंत ते त्यांनी केलेल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका.

या घटनेचं कुणी राजकारण करू नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. परंतु सध्या देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षामध्ये असते तर त्यांनी देखील या गोष्टीचं राजकारण केलं असतं.

या विषयावर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. चर्चा करून जर हा विषय सुटणार असेल, तर आम्ही हा विषय नक्कीच सोडवू.”

पुढे बोलताना ते (Raj Thackeray) म्हणाले, “या गेंड्यांच्या कातड्यांच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. एक जण गेला त्याचा त्यांना फरक पडत नाही. मात्र, आपल्यासाठी प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे.

या लोकांच्या पुन्हा कधी नादी लागू नका. आपण काही गोष्टी कायद्यानं समजून घेऊया. आरक्षणाचं आमिष दाखवून, कधी हे सत्तेत येत आहे, तर कधी ते सत्तेत येत आहे.

विरोधी पक्षात असताना ते मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर ते गोळ्या झाडतात. सत्तेत आल्यावर ते जनतेला तुडवणार. जेव्हा ते विरोधी पक्षात असतात तेव्हा त्यांना जनतेबद्दल अत्यंत प्रेम वाटतं.

मात्र, सत्तेत गेल्यावर हे सगळे मारायला उठतात. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेमध्ये पोलिसांना दोष देऊ नका. पोलिसांना ज्यांनी आदेश दिले त्यांना यामध्ये दोषी ठरवा.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही