Share

Weather Update | पुढचे चार दिवस महत्त्वाचे! राज्यात अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळ

🕒 1 min read Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे हवामानात बदल होत आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटी ही अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पाऊस पडणार असला, तरी उन्हाचा चटका कायम राहणार … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे हवामानात बदल होत आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटी ही अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पाऊस पडणार असला, तरी उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या बदलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

राज्यामध्ये पावसाला वादळी वाऱ्यासह पोषक हवामान असल्याने जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात (Weather Update) आली आहे. आज (26 एप्रिल) राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तापमानातील चढ-उतार कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.

राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यामध्ये आज (26 एप्रिल) छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, हिंगोली, परभणी, बीड, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ वाशिम या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही