Ajit pawar | “दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा” : अजित पवार

Ajit Pawar| बारामती : आज (25 एप्रिल) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी मतदान करण्याचं आवाहन करत सरकारवर निशाणा साधला. तसचं त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोडून भाजपमध्ये जाणार या विषयावर देखील भाष्य केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार (What did Ajit Pawar say)

या मेळाव्यादरम्यान अजित पवार म्हणले की, दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशा मिश्किल शब्दांमध्ये अजित पवार यांनी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. तसचं पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून माझ्या विषयी फारच चुकीच्या बातम्या पसरत आहेत. काही वेळ फोन नॉट रिचेबल लागला, एकाद्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या बैठकीला काही इतर कामानिमित्त गेलो नाही तरीही पत्रकार लोक मागे लागतात अरे बाबांनो बाकीची लोक आहेत की. मी काय 2019 सारख जाणार नाही. मी कायमच राष्ट्रवादीमध्ये राहणार. विरोध खोड्या करण्याचं काम करत आहेत आपण आपलं काम केलं पाहिजे. बारामती साठी सत्ताधाऱ्यांनी बारामतीसाठी काय केली? यांनी काहीच आणले नाही, जे आहे ते बिघडवण्याचे काम सुरू आहे असं ही अजित पवार म्हणाले.

सत्ताधारी सरकारला मी सॉफ्ट कॉर्नर देत नाही (I am not giving a soft corner to the ruling government)

दरम्यान, त्यांनी सत्ताधारी सरकारला मी सॉफ्ट कॉर्नर देत नाही असं ही म्हटलं. मी तुमच्या सारखाच सर्वसामान्य माणूस आहे जसा तुम्हाला सिनेमा बघावा वाटतो तसा मला ही वाटतो. शरद पवार साहेबांनी सुसंस्कृत राजकारणाचा वारसा मला दिला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे. यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजून जोमाने काम करत राहील. अस अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.