Rosemary Water | रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांना मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Rosemary Water | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे केसांना अनेक समस्यांना (Hair problems) तोंड द्यावे लागते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादने केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही रोजमेरी वॉटरचा वापर करू शकतात. रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला रोजमेरी वॉटर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून टाळूवर आणि केसांवर स्प्रे करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला साधारण अर्धा तासानंतर केस धुवावे लागतील. नियमित असे केल्याने तुम्हाला खालील फायदे मिळू शकतात.

केस गळती थांबते (Hair loss stops-Rosemary Water Benefits)

तुम्ही जर केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर रोजमेरी वॉटर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी रोजमेरी वॉटर उपयुक्त ठरू शकते. या समस्येवर मात करण्यासाठी पुरुष आणि महिला दोघांसाठीही हा उपाय सर्वोत्तम ठरू शकतो.

कोंड्याची समस्या दूर होते (Dandruff problem is eliminated-Rosemary Water Benefits)

बदलते हवामान, धूळ, प्रदूषण, माती इत्यादी गोष्टींमुळे केसांना कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी रोजमेरी वॉटर तुमची मदत करू शकते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही रोजमेरी वॉटरसोबतच रोजमेरी तेलाचा देखील वापर करू शकतात. रोजमेरीचा वापर केल्याने केसात साचलेले अतिरिक्त घाण दूर होण्यास मदत होते. परिणामी केसातील कोंडा दूर होतो.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Rosemary Water Benefits)

रोजमेरी वॉटरच्या मदतीने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. त्याचबरोबर केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी तुम्ही रोजमेरी तेलाचा देखील वापर करू शकतात. रोजमेरी वॉटरच्या मदतीने केसांची वाढ झपाट्याने होऊ शकते. नियमित रोजमेरीचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.

रोजमेरी वॉटरचा वापर करून केसांच्या वरील समस्या दूर केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही कॉफीसोबत खालील गोष्टींचा वापर करू शकतात.

मध आणि कॉफी (Honey & Coffee For Skin Care)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर शकतात.

दूध आणि कॉफी (Milk & Coffee For Skin Care)

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कॉफी आणि दूध उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा कॉफी पावडरमध्ये आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थित चेहऱ्यावर लावावे लागेल. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरू शकते. आठवड्यातून एक वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा डागमुक्त होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या