Weather Update | बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय, तर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Climate) सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. त्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या होत्या. अशा परिस्थितीत राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर एप्रिल-मे महिन्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांत येल्लो अलर्ट (Yellow alert in ‘this’ districts)

राज्यात विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 7 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज (Weather Update) हवामान विभागाने दिला आहे. 7 एप्रिलपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यामध्ये आजपासून पावसाला पोषक हवामान (Rainy weather in the state from today)

राज्यामध्ये आजपासून पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. पूर्व विदर्भामध्ये विजांसह पाऊस पडण्याचा इशारा (Weather Update) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिकांची काढणी अजून बाकी आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काढणी 7 एप्रिलच्या आधी करून घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता (Chance of rain at ‘this’ place)

राज्यामध्ये अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, संभाजीनगर, परभणी, जळगाव, बुलढाणा, जालना, या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 7, 8 आणि 9 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button