Walmik Karad । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सीआयडीने तपास सुरू केला असून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. न्यायालयाने वाल्मिक कराड याला सीआयडी कोठडी सुनावली आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
कोठडीमध्ये असलेल्या विष्णू चाटे (Vishnu Chate) याने पवनचक्की कंपनीला दोन कोटी खंडणी मागितली असल्याची मोठी कबुली दिली आहे. त्याच्या कबुलीमुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विष्णू चाटे याने चौकशीदरम्यान कराड याने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली दिली आहे. याबाबतचा अहवाल सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला असून चाटे याच्या मोबाईलवरुन पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते.
Vishnu Chate Statement
दरम्यान, “कराड 15 डिसेंबरला नागपूरमधील मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच कारवाई झाली असती तर हे सगळे घडले नसते. पुण्यामध्ये तो एका घरात थांबला होता, तो कुठे थांबला होता, जे लोक त्याच्यासह हजर झाले आहेत, त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे,” अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :