Walmik Karad । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणाशी निगडित दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. वाल्मिक कराड हा जरी पोलिसांना शरण आला असला तरी अजूनही काही आरोपी मोकाट आहेत. कालच केज पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळेला फरार घोषित केले आहे.
अशातच आता खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. “कराडने परळी येथून पुणे, त्यानंतर गोवा आणि पुन्हा पुणे असा प्रवास केला. त्यावेळी पोलिस काय करत होते? विशेष म्हणजे तो 15 डिसेंबरला नागपूरमधील मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच कारवाई झाली असती तर हे सगळे घडले नसते. पुण्यामध्ये तो एका घरात थांबला होता, तो कुठे थांबला होता, जे लोक त्याच्यासह हजर झाले आहेत, त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे,” अशी मोठी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
दरम्यान, कराड याच्याविरोधात मी एकटा बोलत नसून भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार हे देखील वाल्मिक कराडविरोधात बोलत आहेत. सीआयडीने पारदर्शकपणे तपास करावा, अशी अपेक्षा बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
Bajrang Sonawane Demand
वाल्मिक कराड हा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे विरोधक आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत. यावर पक्ष कोणता निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :