Ayurvedic Remedies | त्वचेचा रंग सुधारण्यासाठी वापरा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic Remedies | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा (Glowing skin) हवी असते. मात्र, वाढते प्रदूषण, धूळ आणि सूर्यप्रकाश यांच्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम व्हायला लागतात. या सर्व गोष्टींमुळे त्वचेचा रंग खराब व्हायला लागतो आणि त्वचा निस्तेज दिसायला लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात किंवा ब्युटी ट्रीटमेंटचा अवलंब करतात. मात्र, या गोष्टी त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक पर्यायांचा अवलंब करू शकतात. या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक पर्यायांचा अवलंब करू शकतात.

हळद (Turmeric-Ayurvedic Remedies for Skin Care)

हळदीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर त्वचेची काळजी घेण्यासाठी हळद उपयुक्त ठरू शकते. हळदीमध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. चेहऱ्यावर हळद लावल्याने काळे डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

चंदन (Sandalwood-Ayurvedic Remedies for Skin Care)

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी चंदनाचा वापर केला जाऊ शकतो. चंदनामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला चंदन पावडरमध्ये आवश्यकतेनुसार गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल.

केशर (Saffron-Ayurvedic Remedies for Skin Care)

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी केशर उपयुक्त ठरू शकते. चेहऱ्यावर केशर लावल्याने त्वचेची घाण साफ होते आणि डागही दूर होतात. केशरामध्ये अंटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला डाग आणि मुरुमांपासून दूर ठेवू शकतात. यासाठी तुम्ही दुधामध्ये केशर मिसळून ते चेहऱ्यावर लावू शकतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकतात. त्याचबरोबर अंजिराचा वापर केल्याने केसांच्या खालील समस्या दूर होऊ शकतात.

केस गळती थांबू शकते (Hair loss can be stopped-Anjeer For Hair)

केस गळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अंजिराची पेस्ट उपयुक्त ठरू शकते. अंजिरामध्ये आढळणारे गुणधर्म केसांना पोषण आणि मजबूत करण्याचे काम करतात. यामध्ये आढळणारे विटामिन ई आणि सी केस गळतीच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतात.

कोंडा दूर होतो (Removes dandruff-Anjeer For Hair)

तुम्ही जर कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर अंजीर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अंजीरामध्ये आढळणारे गुणधर्म टाळू आणि केसांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करतात. अंजिराचा हेअर पॅक वापरल्याने केसातील कोंडा सहज दूर होऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.