Milk and Coffee | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दूध आणि कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Milk and Coffee | टीम महाराष्ट्र देशा: दूध आणि कॉफी आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी कॉफी आणि दुधाचा वापर केला जातो. कॉफीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कॉफी आणि दुधाचा फेसपॅक वापरू शकतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला तीन चमचे कच्चा दुधामध्ये एक चमचा कॉफी पावडर मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकतात. या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचेला पुढील फायदे मिळू शकतात.

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी फायदेशीर (Beneficial to increase the glow on the face-Milk and Coffee Facepack)

दूध आणि कॉफी फेस पॅकच्या मदतीने त्वचेवरील चमक सुधारू शकते. त्याचबरोबर या फेस पॅकचा वापर केल्याने त्वचेवरील डाग दूर होऊ शकतात. या फेस पॅकचा नियमित वापर केल्याने त्वचेवर नैसर्गिक पद्धतीने चमक येऊ शकते.

मुरुमांसाठी फायदेशीर (Beneficial for acne-Milk and Coffee Facepack)

कॉफी आणि दुधाच्या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर केल्या जाऊ शकते. त्वचेवरील मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून तीन वेळा या फेसपॅकचा वापर करावा लागेल. याचा नियमित वापर केल्याने त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात.

सुरकुत्या दूर होतात (Wrinkles are removed-Milk and Coffee Facepack)

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी कॉफी आणि दुधाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने त्वचेवर चमक वाढते आणि त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात.

पिगमेंटेशन दूर होते (Pigmentation is removed-Milk and Coffee Facepack)

पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट दूर करण्यासाठी कॉफी आणि दुधाचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास देखील मदत होते. त्याचबरोबर या फेसपॅकच्या मदतीने चेहऱ्यावरील डागांची समस्या कमी होऊ शकते.

कॉफी आणि दुधाचा फेसपॅक वापरल्याने त्वचेला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर केस काळे आणि निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा पुढील पद्धतीने वापर करा.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता (Curry leaves And Coconut Oil-For Hair Care)

खोबरेल तेल आणि कढीपत्त्याचा वापर करून केस काळे ठेवता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये दहा ते पंधरा कढीपत्ते मिसळून घ्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला हे तेल कोमट करून घ्यावे लागेल. या तेलाने तुम्हाला केसांना हलक्या हाताने मसाज करावी लागेल. त्यानंतर साधारण तीन तासांनी तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. खोबरेल तेल आणि कढीपत्त्याच्या मदतीने केस निरोगी राहू शकतात.

खोबरेल तेल आणि मेथीचे दाणे (Fenugreek seeds And Coconut Oil-For Hair Care)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये मेथी दाणे मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला तीन ते चार चमचे खोबरेल तेलामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकून तेल कोमट करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल गाळून घ्यावे लागेल. या तेलाने केसांना नियमित मसाज केल्याने केस निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर या तेलाच्या मदतीने केसांच्या वाढीस चालला मिळते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या