Anil Parab । सुनील प्रभू यांचाच व्हिप सर्वांना लागू होणार ;अनिल परबांचा दावा

Anil parab | मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर निकाल काल दिला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले ( Bharat Gogave) यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर 16 आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपण्यात आलं आहे. आता यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil parab) यांनी आमचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार असा दावा केला आहे.

सुनील प्रभूंचे व्हिप सर्व सदस्यांना लागू होणार : अनिल परब

आज ( 12 मे) पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले की, सुनील प्रभूंचे व्हिप सर्व सदस्यांना लागू होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे आता आमच्याच गटाचा व्हिप लागू होणार आहे. जर लवकरात – लवकर विधानसभा अध्यक्षनी 16 आमदारांच्या आपत्रेबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला. तर कोर्टाकडूनच अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. यामुळे आता कोणतीही कारण न देता निर्णय घ्यावा. असं परब म्हणाले.

(Sunil Prabhu’s whip will be applicable to all members: Anil Parab )

दरम्यान, कोर्टाच्या निकालानंतर सलग दुसऱ्या दिवशी देखील उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की,
निर्णय हा कोर्टाने विधानसभा अध्यक्षनकडे दिला आहे यामुळे त्यांनी जर निर्णय काही वेडावाकडा घेतला तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. त्यानंतर जी काही सरकारची बदनामी होईल याला ते जबाबदार असतील असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-