Sunetra Pawar vs Ashish Shelar | भाजप नेते आशिष शेलार शुक्रवारी पुण्यात महायुतीच्या मेळाव्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. शेलार यांना बारामतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव निश्चित आहे, असं शेलार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आशिष शेलार यांना चूक लक्षात येताच त्यांनी चूक सारवासारव केली. त्यानंतर ते म्हणाले, बारामतीत सुनेत्रा ताईंचा विजय निश्चित आहे तर सुप्रियाताईंचा पराभव नक्की होणार आहे. मात्र शेलारांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर विरोधकांनी जोरदार टिका केली आहे.
पुढे बोलतांना शेलार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले,” घरात येणारी सून लक्ष्मी असते तिला बाहेरची म्हणणे हे वेदनादायी वक्तव्य असून लोकांना न रुचणारे आहे. पवार यांनी मराठी संस्कृती जपली पाहिजे, असे शेलार म्हणाले.
सुनेत्रा अजित पवारांचा बारामतीतून पराभव होणार; CM Eknath Shinde यांचे संकेत
यापूर्वी सुनेत्रा अजित पवारांचा बारामतीतून पराभव होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचा दावा विजय शिवतारेंनी केला होता. ते म्हणाले होते कि,”अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभावाचे धनी नको व्हायला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचा दावा विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या