राणेंना लटकून लटकून उमेदवारी, राडेबाज संस्कृती आणि विकृती येऊ देणार नाही – विनायक राऊत

Vinayak Raut vs Narayan Rane lok sabha election 2024

Vinayak Raut vs Narayan Rane | महाविकास आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईन, असा आत्मविश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला

मंत्री असून देखील राणेंना इतकं लटकून लटकून उमेदवारी दिली. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणजे देव पावला. नारायण राणेंच्या पराभवाची हॅट्रीक होणार तसेच त्यांचे डिपॉजिट वाचलं तरी खूप झालं असे विनायक राऊत म्हणाले.

विनायक राऊत पुढे असेही म्हणाले की, मोदींच्या कार्यकाळातील अकार्यक्षम मंत्री म्हणजे नारायण राणे. सर्वांच्या उमेदवारी जाहीर झाल्या, केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांना लटकवून लटकवून उमेदवारी दिली, यावरूनच त्यांची योग्यता आणि पात्रता कळून येते.

मोदींना सुद्धा माहिती आहे या मतदारसंघातून नारायण राणे यांचा पराभव होणार. राडेबाज संस्कृती आणि विकृती आम्ही येऊ देणार नाही. असे म्हणत विनायक राऊतांनी निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या