सातारी आल्याच्या बेण्यास ५५ हजार दर !

55,000 price for ginger!

Ginger price : देशभरातील प्रसिद्ध सातारी आले पिकाच्या बेण्यास (बियाणे) पाचशे किलोसाठी तब्बल ५५ हजार दर मिळाला आहे. गेल्या वर्षी झालेला अपुरा पाऊस आणि यंदाचा तीव्र उन्हाळा यामुळे यंदा आले उत्पादन घटण्याच्या भीतीने यंदा आल्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. यामुळे त्याच्या लागवडीसाठी बेण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. साताऱ्याचे आले हे देशात प्रसिद्ध आहे. या पिकाच्या लागवडीसाठी सध्या बेणे काढणीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता देणारे पीक म्हणून आल्याकडे पाहिले जाते.

आले पिकास मसाल्यामध्ये, आयुर्वेदिक औषधांमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्दी, खोकला, पोटाचे विकार यामध्ये आले वापरले जाते. यातही सातारी आल्याला फार महत्त्व आणि मागणी आहे आणि दरही जास्त मिळतो. हळद आणि ऊस या पिकानंतर नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणून आले पिकाकडे पाहिले जाते. यंदा उत्पादनात घट होणार असल्याच्या शक्यतेने साताऱ्यात आल्याच्या बियाण्याची मागणी वाढली आहे. सातारी आल्याचे बेणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सातारी आल्याला देशभरात मोठा भाव मिळतो. म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमता देणारे पीक म्हणूनही या पिकाकडे पहिले जाते.

देशभरात सातारी आले हे प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात आल्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या आल्याच्या शेतीच्या लागवडीसाठी आल्यापासूनच तयार केलेले बेणे बियाणे म्हणून वापरले जाते. गेल्या वर्षी झालेला अपुरा पाऊस आणि यंदाचा तीव्र उन्हाळा यामुळे यंदा आले उत्पादन घटण्याच्या भीतीने आल्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. यामुळे त्याच्या लागवडीसाठी बेण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

सध्या या बेणे काढणीच्या कामांना वेग आला आहे. यंदा मातीसह असलेल्या आल्याच्या बेण्यास (धुणीचे आले) प्रतिगाडी (५०० किलो) ४० ते ४२ हजार रुपये तर धुतलेल्या, स्वच्छ केलेल्या बेण्यास ५५ हजार दर मिळत आहे. आल्याच्या बेण्याच्या दरातील ही मोठी वाढ समजली जाते. जिल्ह्यात सरासरी तीन हजार हेक्टर क्षेत्रात आल्याची लागवड होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

आले पिकांस गतवर्षीपासून चांगले दिवस आले आहेत. डिसेंबरपर्यंत आले बेण्याच्या प्रतिगाडीस ३० ते ३५ हजार रुपये दर होता. मात्र पुढीलवर्षी उत्पादनात घट होत आल्याला मागणी वाढणार हे लक्षात येताच आल्याच्या लागवडीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. यामुळे डिसेंबरपासून आले बेण्याच्या दरात पुन्हा सुधारणा होत गेली. फेब्रुवारीमध्ये आले बेण्याचे दर ४० हजार रुपयांपर्यंत होते. आता त्यामध्ये आणखी वाढ होत आता एप्रिलच्या सुरुवातीस ते गाडीस ५५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

आले शेतातच राखण्यावर भर

सध्या आले पिकाचे दर समाधानकारक आहेत. यामुळे पुढील काळात दरात आणखी वाढ होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याची विक्री न करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. आले जमिनीत ठेवल्यावर त्याची वाढ सुरू होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकरी आले शेतातच राखून ठेवत आहेत. यामुळे कधी नव्हे ते व्यापारी आल्यासाठी शेतकऱ्यांकडे मागणी करीत असल्याचे आणि शेतकरी त्यास नकार देत असल्याचे चित्रही पाहण्यास मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.