हळदीला प्रतिक्विंटल किमान १२ ते १६ हजार रुपयांचा दर

Minimum rate of 12 to 16 thousand rupees per quintal for turmeric

हिंगोली : मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशातून हळदीची आवक वाढत असताना हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला प्रतिक्विंटल १२ ते १६ हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे मार्केट यार्ड आवारासह बाहेरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आलेला माल मोजून घेण्यासाठी वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांना वार्डाच्या आवारात मुक्काम करावा लागला.

नवीन हळद विक्रीला आली आहे. अनेक भागात काढणीची लगबगही सुरू आहे. बाजारात मागील आठवड्यापासून आवक वाढली आहे. हळद विक्रीसाठी आलेल्या वाहनांची रांग आता दीड ते दोन किमी एवढी झाली आहे.

मार्केट यार्डात शनिवारी व रविवारी हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे दर सोमवारी हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत.

१५ व १६ एप्रिल रोजी हिंगोलीसह नांदेड, परभणी, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अकोला, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती. दोन काट्यावर केवळ पाच हजार क्विंटलच हळद मोजमाप करण्याची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.