Besan and Turmeric | हळद आणि बेसनाचा ‘या’ पद्धतीने वापर करून चेहरा ठेवा स्वच्छ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Besan and Turmeric | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन आणि हळद खूप फायदेशीर असते. त्वचेला नैसर्गिक पद्धतीने निरोगी ठेवण्यासाठी बेसन आणि हळदीच्या मिश्रणाचा वापर केला जातो. या मिश्रणाने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. हळद आणि बेसनाच्या वापराने त्वचेवरील डाग, पिंपल्स, डेट स्किन इत्यादी समस्या कमी होतात. त्याचबरोबर चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हळद आणि बेसनाचा वापर करू शकतात. होय! तुम्ही हळद आणि बेसनाचा क्लिनर म्हणून वापर करू शकतात.

चेहरा साफ करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण या उत्पादनामुळे चेहऱ्याला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही हळद आणि बेसनाचा क्लिनर म्हणून वापर करू शकतात. हळद आणि बेसनाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करण्यासाठी पुढील पद्धतींचा वापर करावा.

बेसन-हळद आणि गुलाब जल

बहुतांश लोक चेहरा साफ करण्यासाठी गुलाब जल वापरतात. पण तुम्ही गुलाब जलसोबत एक चमचा बेसन आणि चिमूटभर हळद मिसळून चेहरा स्वच्छ करू शकतात. या मिश्रणाने चेहरा साफ केल्यास त्वचेवरील डेड स्किन आणि घाण साफ होण्यास मदत होते. बेसन-हळद आणि गुलाब जल यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला तीन ते चार मिनिटे गोलाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. त्यानंतर पाच मिनिटांनी तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होऊ शकते.

बेसन-हळद आणि दूध

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेसन आणि हळदीमध्ये कच्चे दूध मिसळू शकतात. या मिश्रणाचा तुम्ही क्लिनर म्हणून वापर करू शकतात. नियमित हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर हे मिश्रण त्वचेला नैसर्गिकरित्या मोईश्चराइज करते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या