Hair Fall | केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Hair Fall | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याचे सवयीमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. मात्र, सतत केमिकलचा वापर करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे घरगुती उपाय केल्याने केसांना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

कोरफड (Aloevera For Hair Fall)

कोरफड आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर केसांना लावू शकतात. तुम्हाला साधारण अर्धा तास कोरफडीचा गर केसांना लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. कोरफडीचा वापर केल्याने केस गळतीची समस्या सहज दूर होऊ शकते.

मेथी दाणे (Fenugreek seeds For Hair Fall)

केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी मेथी दाणे उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुम्हाला रात्रभर मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवावे लागतील. त्यानंतर तुम्हाला सकाळी या दाण्याची पेस्ट बनवून केसांना आणि टाळूला लावावी लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस धुवावे लागतील. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

कांद्याचा रस (Onion juice For Hair Fall)

कांद्याच्या रसामध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करतात. केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला कांद्याचा रस केसांना लावून ठेवावा लागेल. साधारण तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस तुमच्या नियमित शाम्पूने धुवावे लागतील. नियमित कांद्याच्या रसाचा वापर केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

केस गळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने लिंबाचा वापर करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water For Weight Loss)

लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक लिंबू पाण्याचे सेवन करतात. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि उष्माघातापासून संरक्षण होते. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू सॅलड (Lemon salad For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचे सॅलड खाऊ शकतात. लिंबाचे सॅलड खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे लवकर भूक लागत नाही, परिणामी वजन कमी होते. त्याचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या