Fennel Seeds | उन्हाळ्यामध्ये उष्माघाताची समस्या टाळायची असेल, तर बडीशेपचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Fennel Seeds | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे उष्माघात (Heatstroke) ची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यावर मात करण्यासाठी तुम्ही बडीशेपचे सेवन करू शकतात. उन्हाळ्यामध्ये बडीशेपचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बडीशेपमध्ये कॅल्शियम, फायबर, विटामिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे उष्माघाताच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने बडीशेपचे सेवन करू शकतात.

बडीशेप चहा (Fennel Seeds tea-For Heatstroke)

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही बडीशेपचा चहा पिऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. हे पाणी तुम्हाला गाळून थंड करून प्यावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्ही उष्माघातापासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर बडीशेप चहा प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होऊ शकते आणि शरीर निरोगी राहते.

बडीशेप आणि साखर पाणी (Fennel Seeds and sugar water-For Heatstroke)

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही बडीशेप आणि साखरेच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यामध्ये विटामिन, कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे उष्माघाताची समस्या दूर करण्यास मदत करतात. बडीशेप आणि साखरेचे पाणी प्यायल्याने उन्हाळ्यातील अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. हे पेय शरीराला आतून थंड आणि हायड्रेट ठेवते. या पेयाचे सेवन केल्याने पचनाच्या अनेक समस्या दूर होतात.

बडीशेप सरबत (Fennel Seeds -For Heatstroke)

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही बडीशेपचे सरबत पिऊ शकतात. हे बनवण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप आणि तीन ते चार पुदिन्याचे पाने मिसळून ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पेय गाळून घ्यावे लागेल. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मध देखील मिसळू शकतात. हे मिश्रण प्यायल्याने शरीर हायड्रेट आणि थंड राहते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने अपचन, गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होतात.

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने बडीशेपचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये सतत चक्कर येत असेल, तर तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

पुदिन्याचे तेल (Peppermint oil-Dizziness)

उन्हाळ्यामध्ये चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पुदिन्याचे तेल उपयुक्त ठरू शकते. पुदिन्याचे तेल अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. या तेलाच्या मदतीने उलट्या, मळमळ, डोकेदुखी आणि चक्कर इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला बदाम तेलामध्ये पुदिना तेल मिसळून डोक्याला मसाज करावी लागेल. नियमित या तेलाने मसाज केल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होते.

सुकी कोथिंबीर (Dry coriander-Dizziness)

चक्कर येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सुकी कोथिंबीर फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला रात्री एक ग्लास पाण्यामध्ये आवळ्यासोबत कोथिंबीर भिजवून ठेवावी लागेल. सकाळी उठल्यावर तुम्हाला रिकाम्या पोटी या पाण्याचे गाळून सेवन करावे लागेल. याचे सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होते आणि पोटही व्यवस्थित साफ होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.