Dizziness | उन्हाळ्यामध्ये सतत चक्कर येते का? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dizziness | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे डीहायड्रेशन (Dehydration) च्या समस्याला सामोरे जावे लागते. उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्याने अनेकांना चक्कर येते. सतत चक्कर येणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर उपाय करणे खूप महत्त्वाचे असते. उन्हामुळे चक्कर येत असेल, तर तुम्ही त्यावर काही घरगुती उपाय करू शकतात. हे उपाय केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उन्हाळ्यामध्ये सतत चक्कर येत असेल, तर तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

पुदिन्याचे तेल (Peppermint oil-Dizziness)

उन्हाळ्यामध्ये चक्कर येण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पुदिन्याचे तेल उपयुक्त ठरू शकते. पुदिन्याचे तेल अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. या तेलाच्या मदतीने उलट्या, मळमळ, डोकेदुखी आणि चक्कर इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला बदाम तेलामध्ये पुदिना तेल मिसळून डोक्याला मसाज करावी लागेल. नियमित या तेलाने मसाज केल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होते.

सुकी कोथिंबीर (Dry coriander-Dizziness)

चक्कर येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सुकी कोथिंबीर फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला रात्री एक ग्लास पाण्यामध्ये आवळ्यासोबत कोथिंबीर भिजवून ठेवावी लागेल. सकाळी उठल्यावर तुम्हाला रिकाम्या पोटी या पाण्याचे गाळून सेवन करावे लागेल. याचे सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या दूर होते आणि पोटही व्यवस्थित साफ होते.

आल्याचा चहा (Ginger tea-Dizziness)

आल्याचे सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या सहज दूर होऊ शकते. आल्यामध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात, जे थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये आल्याचा एक तुकडा टाकून ते पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी तुम्हाला गाळून कोमट करून प्यावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या सहज दूर होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये चक्कर येत असेल, तर तुम्ही वरील घरगुती उपाय करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या घामोळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक उपाय करू शकतात.

कडुलिंबाची पेस्ट (Neem paste-For Prickly Heat)

कडूलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात, जे घामोळ्यांच्या समस्येवर मात उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुम्हाला कडुलिंब बारीक करून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटं घामोळ्यांवर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट थंड पाण्याने धुवावे लागेल. उन्हाळ्यामध्ये नियमित या पेस्टचा वापर केल्याने घामोळ्या आणि जळजळ दूर होऊ शकते.

मध (Honey-For Prickly Heat)

घामोळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी मध मदत करू शकतो. मधामध्ये आढळणारे अॅंटीबॅक्टरियल गुणधर्म घामोळ्या दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला घामोळ्यांवर साधारण दहा मिनिटे मध लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तो भाग थंड पाण्याने धुवावा लागेल. घामोळ्यांवर मध लावल्याने घामोळ्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.