Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल वाढते वजन प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषध आणि पावडरचे सेवन करतात. मात्र, या गोष्टींचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा (Lemon) वापर करू शकतात. लिंबामध्ये आयरन, फायबर, सोडियम, पोटॅशियम आणि विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने लिंबाचा वापर करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water For Weight Loss)

लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक लिंबू पाण्याचे सेवन करतात. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि उष्माघातापासून संरक्षण होते. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू सॅलड (Lemon salad For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचे सॅलड खाऊ शकतात. लिंबाचे सॅलड खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे लवकर भूक लागत नाही, परिणामी वजन कमी होते. त्याचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

लिंबू चहा (Lemon tea For Weight Loss)

लिंबाच्या चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. त्याचबरोबर लिंबाचा चहा प्यायल्याने गॅस, एसिडिटी, बद्धकोष्टता, अपचन इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. या चहाचे सेवन केल्याने मूड फ्रेश राहू शकतो.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये उष्माघाताची समस्या टाळण्यासाठी तुम्ही बडीशेपचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

बडीशेप चहा (Fennel Seeds tea-For Heatstroke)

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही बडीशेपचा चहा पिऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बडीशेप एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. हे पाणी तुम्हाला गाळून थंड करून प्यावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्ही उष्माघातापासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर बडीशेप चहा प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होऊ शकते आणि शरीर निरोगी राहते.

बडीशेप आणि साखर पाणी (Fennel Seeds and sugar water-For Heatstroke)

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही बडीशेप आणि साखरेच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यामध्ये विटामिन, कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे उष्माघाताची समस्या दूर करण्यास मदत करतात. बडीशेप आणि साखरेचे पाणी प्यायल्याने उन्हाळ्यातील अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. हे पेय शरीराला आतून थंड आणि हायड्रेट ठेवते. या पेयाचे सेवन केल्याने पचनाच्या अनेक समस्या दूर होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या