🕒 1 min read
लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस उत्कंठावर्धक ठरतोय. एकीकडे इंग्लंडला विजयासाठी अजून 350 धावांची गरज आहे, तर दुसरीकडे भारतीय फलंदाज केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या खेळावर वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी दोघांवर ‘खेळाची गती जाणूनबुजून मंदावण्याचा’ आरोप केला आहे.
ब्रॉडने कॉमेंट्रीदरम्यान स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “राहुल आणि पंत प्रत्येक चेंडूनंतर पुढचा चेंडू खेळण्यासाठी जास्त वेळ घेत होते. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांचं लक्ष विचलित झालं.” त्याने पुढे सूचित केलं की पंचांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवं.
Stuart Broad slams KL Rahul and Rishabh Pant
“मी स्वतः खेळताना फलंदाजांना सांगायचो की, मी रनअपसाठी येईपर्यंत तुम्ही तयार राहा. राहुल अजून मैदानात जास्त वेळ नजर फिरवत होता, ज्यामुळे कार्सला बॉल टाकायला उशीर लागत होता,” असं ब्रॉड म्हणाला.
कॉमेंट्रीमध्ये उपस्थित असलेल्या मेल जोन्स यांनीही या आरोपांना दुजोरा दिला. “गोलंदाज तयार असताना फलंदाजही सज्ज असले पाहिजेत. जर जाणूनबुजून वेळ घेतला जात असेल, तर तो विरोधी संघाची लय मोडण्याचा प्रकार वाटतो,” असं त्या म्हणाल्या.
पहिल्या डावात भारताने 471 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल 465 धावांचा डाव खेळला. दुसऱ्या डावात भारताकडून राहुलने 137 आणि पंतने 118 धावांची शानदार खेळी केली. करुण नायर (20), साई सुदर्शन (30) आणि रवींद्र जडेजा (25) यांनीही उपयोगी भर घातली.
इंग्लंडकडून जोश टंग आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने 21 धावा केल्या असून, विजयासाठी अजून 350 धावांची गरज आहे. सामना आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “हिंदूंमध्ये फूट म्हणजे जिहाद्यांना मदत” नितेश राणेंचा संताप; मनसेला झणझणीत उत्तर!
- “मी बंडात गेलो असतो, तर उघडपणे गेलो असतो!” – जाधव यांचा स्फोटक दावा
- “पवारांना सोडणं आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती” – भास्कर जाधव यांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now