Share

“हिंदूंमध्ये फूट म्हणजे जिहाद्यांना मदत” नितेश राणेंचा संताप; मनसेला झणझणीत उत्तर!

Nitesh Rane slams MNS protest, warns against splitting Hindus for political gains.

Published On: 

Nitesh Rane Nilesh Rane

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी सक्तीविरोधात आंदोलन पुकारलं असून त्यावरून राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “हिंदी सक्तीचा विरोध करताना आपण नकळत हिंदू राष्ट्र तोडण्याच्या षड्यंत्राला खतपाणी घालत आहोत का, याचा गांभीर्याने विचार करावा,” असं आवाहन त्यांनी केलं.

राणे म्हणाले, “आमच्या सरकारने हिंदी सक्ती केली नाही, पण मराठीला प्राधान्य देणं हे आमचं धोरण आहे. हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या, पण हिंदू समाजात फुट पाडून कोणाचे हेतू साध्य होतात याचा विचार करा. हिंदूंमध्ये भांडण म्हणजे जिहादी विचारसरणीस चालना देणं!”

Nitesh Rane criticizes Raj Thackeray’s MNS

राणे यांनी अबू आजमी यांच्यावरही घणाघात केला. “दर शुक्रवारी वर चढणाऱ्या गॅस सिलेंडरवर काहीच न बोलणारे आजमीसारखे कारटे वारकरी वारीवर मात्र टीका करतात. आमची वारी वर्षभर चालत नाही, पण त्या रोजच्या गॅस सिलेंडरवर तुम्ही गप्प का? उद्या आम्ही हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? वारीवर कोणी बोलायची हिंमत करू नये. आमची वारी ही आमच्या श्रद्धेचा भाग आहे आणि ती सुरुच राहणार.”

राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही कडवट शब्दांत टीका केली. “गद्दार कोण? यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहायला हवं. सगळ्यात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची जी अवस्था झाली आहे, त्याला जबाबदारही तोच. आरशात स्वतःचं रूप पहा आणि मग आरोप करा.”

ते पुढे म्हणाले, “गुलाबराव पाटील यांनी जे म्हटलं ते योग्य होतं. जेव्हा राज ठाकरे रस्त्यावर उतरले, तेव्हा यांची गाडी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोडली. राऊत म्हणजेच खरा शकुनी मामा.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही