IPL 2023 | आज संध्याकाळी स्टार स्पोर्ट्स करणार आयपीएल आगामी हंगामाबाबत ‘ही’ मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी नुकताच महिला क्रिकेटपटूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. तर डिसेंबर महिन्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा लिलाव पार पडला होता. यानंतर आता क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा सोळावा हंगाम कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. चाहत्यांची ही उत्सुकता लवकरच संपणार असल्याचे स्टार स्पोर्ट्सने सांगितले आहे.

स्टार स्पोर्ट्स करणार आयपीएल आगामी हंगामाबाबत मोठी घोषणा (Star Sports will make a big announcement about the IPL 2023)

आज संध्याकाळी 5 वाजता स्टार स्पोर्ट्स आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. 31 मार्च 2023 पासून आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा आयपीएल मार्च ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. स्टार स्पोर्ट यावर्षी आयपीएलचे पंधरा वर्ष साजरे करण्याची योजना आखत आहे. आयपीएल स्टार आणि भारताचे दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि इरफान पठाण यांच्या उपस्थितीमध्ये स्टार स्पोर्ट काही आकर्षक पुरस्कार देखील जाहीर करणार आहे.

भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना यावर्षी आयपीएलमध्ये दहा वर्षे पूर्ण होत आहे. गेल्या पंधरा वर्षापासून क्रिकेट खेळाडूंना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आयपीएलच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळाले आहे. स्टार स्पोर्ट याच स्मरणीय क्षणांना उजाळा देण्याची योजना आखत आहे.

आयपीएल 2023 मध्ये बस चालकाच्या मुलाला खेळण्याची संधी (A bus driver’s son got a chance to play in IPL 2023)

आयपीएल 2023 मध्ये अब्दुल बसीथ या बस चालकाच्या मुलाला खेळण्याची संधी मिळाली आहे. अब्दुल बसीथ हा केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये काम करणाऱ्या एका चालकाचा मुलगा आहे. तो आता संजू सॅमसंनच्या खांद्याला खांदा लावून मैदानावर उतरणार आहे. राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसीथला आपल्या संघामध्ये सामील केले आहे. यावर्षी राजस्थान रॉयल्सने विकत घेतलेल्या 9 खेळाडूंपैकी 3 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. दरम्यान, आरआरने अब्दुल बसीथ या नवीन खेळाडूला संधी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या