Sanjay Raut। संजय राऊतांच मोदींसह भाजपवर टीकास्त्र ; म्हणाले …

Sanjay Raut । मुंबई : काही दिवसांवरच कर्नाटकची निवडणूक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करत अपशब्द वापरला होता त्यावरून भाजपने संताप व्यक्त केला आहे. तर आता या विषय खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील खरगेचं समर्थन करत भाजपसह नरेंद्र मोदींवर टीकास्त्र केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ( What did Sanjay Raut say )

संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशात जात आणि धर्माच्या नावानं विष पसरविण्याचं काम केलं जात आहे. कदाचित याच मुद्द्यावरून खरगे यांनी तसं म्हटलं असावं. पण त्यात इतकं वाईट वाटून किंवा महत्व देण्याचं कारण काय? कारण आमच्या महाराष्ट्रात नागाला, सापाला पुजलं जातं. त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. तो शेतीचा चौकिदार आहे. तर साप किंवा नाग हे बिनकामाचे कोणाला चावत नाही दंश करत नाही. जोपर्यंत त्याला त्रास देत नाही. तर मला वाटतं या गोष्टीला इतकं महत्त्व देण्याची गरज नाही. त्यामुळे खरगे यांनी पंतप्रधानांचा गौरवच केला आहे. असं मला वाटत असं राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचा चांगलंच समाचार घेत म्हटलं की, काँग्रेस अध्यक्ष यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. यामुळे ते असं बोलत आहेत. जर त्यांनी निवडणुकीत मर्यादा ओलांडल्या तर त्याचा चांगलाच समाचार घेऊ. मौत का सौदागर पासून सुरू झालेला काँग्रेस नेताच पोटसुळ आता आज जहरीला साप इथपर्यंत येऊन पोहचला आहे. त्याच्या शब्दकोशात चांगले शब्द नाहीत. त्याची सत्ता गेली, नेते गेले, पक्ष देखील गेला यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. असा बावनकुळे यांनी खरगेवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button