Sanjay Gaikwad | “पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी, आम्ही कमीत कमी…”; संजय गायकवाडांनी बावनकुळेंना सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. यावरुन आता भाजप-शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे. यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता गायकवाड यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

Sanjay Gaikwad talk about Bawankule’s Statement 

“सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजप-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे”, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत.

संजय गायकवाड यांची बावनकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

“शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी 130 ते 140 जागा लढवणार आहोत. आमच्यापेक्षा भाजप मोठा पक्ष असल्याने निश्चितपणे भाजप जास्त जागा लढेल. पण आम्ही शिवसेना म्हणून 125 पेक्षा कमी जागा लढणार नाही. तसेच बावनकुळे यांच्याबद्दल विचारले असता गायकवाड म्हणाले की, अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळेंना समज द्यावी”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकळे काय म्हणाले?

“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल.” असं वक्तव्य नंतर बावनकुळे यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या-