Bacchu Kadu | जागावाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं उत्तर, म्हणाले…

Bacchu Kadu | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. यावरुन आता भाजप-शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे. यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Bacchu Kadu talk about Chandrashekhar Bawankule’s Statement

“ते (जागावाटप) त्यांचं व्यक्तीगत आहे. आमची भाजप-शिंदे गटाशी काही युती नाही. आमचा फक्त त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे जेव्हा युती होईल तेव्हा पाहू”, असं म्हणत बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकळे काय म्हणाले?

“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल.” असं वक्तव्य नंतर बावनकुळे यांनी केलं.

Sanjay Shirsat Comment on Bawankule’s Statement 

“बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते”, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.