जालनाः जर आपलं सरकार आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेचीही पोळी भाजून घ्यावी लागणार आहे त्यामुळे लोकसभेतच विधानसभेची तयारी करा असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, आज अर्जुनरावजी माझ्यासोबत आहेत. उद्या हा रावसाहेब दाणवेदेखील अर्जुनरावसोबत असणार हा शब्द देतो. विधानसभेला सहा महिने बाकी आहेत. मी तुम्हाला शब्द देतो मागे हटणार नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील भाग्यनगर येथील आपल्या बंगल्यासमोर आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यास दानवे संबोधीत करत होते. यावेळी शिवसैनिकांना आवाहन करत असताना काही नाराज शिवसैनिकांनी या निर्धार मेळाव्यातून उठून जाण्याचा पवित्रा घेतला.
गेल्या वेळी अर्जुन खोतकर यांना भाजपच्या लोकांनी मतदान न केल्यामुळे त्यांचा पराभव झाल्या अशा प्रकारच्या नाराज शिवसैनिकांमध्ये, मतदारांमध्ये उलट-सुलट चर्चा पहायला मिळाली.
यावेळी बोलताना जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दाणवे म्हणाले, आता अर्जुन खोतकर जसे माझ्यासोबत आहेत. तसेच आपण विधानसभेला त्यांच्यासोबत राहणार असल्याचे वचनही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले, मात्र काही शिवसैनिकांमध्ये नाराजी पहायला मिळाली. रावसाहेब दाणवे सभेला जसे अनुमोदन करायला लागले तसे काही शिवसैनिकांनी सभेमधून काढता पाय घेतला.
महत्वाच्या बातम्या











