Share

शिंदे गटाच्या आमदाराकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण? जीवे मारण्याची धमकी

BJP worker alleges he was beaten and threatened with death by Shinde Sena MLA Ramesh Bornare over road work issue. Police not registering complaint despite waiting for hours.

Published On: 

BJP worker alleges he was beaten and threatened with death by Shinde Sena MLA Ramesh Bornare over road work issue. Police not registering complaint despite waiting for hours.

🕒 1 min read

वैजापूर – शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे ( Ramesh Bornare ) यांनी रस्त्याच्या कामावरून भाजप कार्यकर्त्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे कार्यकर्ते कैलास पवार यांनी केला आहे. पवार यांनी सांगितले की, त्यांच्या घराजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून वाद झाला आणि यावेळी बोरनारे यांनी शिवीगाळ करत धमकी दिली.

पवार यांनी तक्रारीत म्हटलं की, “आमदारांनी प्लॉट नंबर ४८ मधून रस्ता काढण्याचे आदेश दिले. मी लेआऊट बघायला सांगितलं तेव्हा आमदार भडकले आणि म्हणाले – ‘तू फार दिवस आमच्या डोक्यावर आहेस, तुझी फॅमिली संपवू’, असं म्हणत त्यांनी मला मारहाण केली.” पवार यांनी तीन तास वैजापूर पोलीस ठाण्यात बसूनही तक्रार नोंदवली गेली नसल्याचं सांगितलं. “पोलीस उडवाउडवीचं उत्तर देत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

Shinde MLA Ramesh Bornare Accused of Beating BJP Worker

या प्रकरणावर आमदार रमेश बोरनारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नागरिकांच्या मागणीनुसार नगरपरिषदेचे अधिकारी घटनास्थळी बोलावले होते. तेथे कैलास पवार आले आणि अरेरावीची भाषा करत वाद घडवून आणला. त्यातून गोंधळ झाला.”

सध्या स्थानिक राजकारणात या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला असून, पोलिसांची भूमिका आणि आमदारांवरील आरोप यावर पुढील कायदेशीर पावले महत्त्वाची ठरणार आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या