🕒 1 min read
मुंबई : “आमचं जहाज बुडणार नाही, भाजपचं जहाज ओव्हरलोड झालंय, त्यामुळे बुडण्याची भीती त्यांनाच आहे,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शनिवारी शिवसेना भवनात झालेल्या आमदार, खासदार व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काश्मीर हे आपलं होतं, आहे आणि कायमच आपलंच राहील. एकवेळ भाजप देशात नसेल, तरी काश्मीर भारताचाच राहील.” तसेच, देशावर संकट आलं तर आम्ही पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहू पण सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Uddhav Thackeray Says BJP Ship Overloaded
‘वन नेशन वन इलेक्शन’चा अभ्यास सुरू आहे पण निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी, आणि प्रचारात पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी सहभागी होऊ नये, अशीही मागणी त्यांनी केली.
बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना जनसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करण्याचे आदेश दिले आहेत. “राज्यातील महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, लाडकी बहीण योजना – या सर्व मुद्द्यांवर स्थानिक पातळीवर आवाज उठवा,” असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न, आपच्या 13 नगरसेवकांची राजीनामा देत ‘इंद्रप्रस्थ विकास पार्टी’ची स्थापना
- “तुला ब्लाउज काढावं लागेल”, दिग्दर्शकाच्या मागणीनं माधुरीला बसला धक्का
- “तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही”; जगाचा निरोप घेण्यापूर्वी लक्ष्याने काढली होती या खास दोस्तांची आठवण