🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेमध्ये आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. एकाच वेळी 13 नगरसेवकांनी आप पक्षाचा राजीनामा दिला असून, ‘इंद्रप्रस्थ विकास पार्टी’ नावाने स्वतंत्र गटाची स्थापना केली आहे. या नव्या गटाचे नेतृत्व मुकलेश गोयल आणि हेमचंद गोयल करत आहेत.
महापौर निवडणुकीदरम्यान आपच्या नगरसेवकांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षात नाराजीचा सूर होता. त्या पार्श्वभूमीवरच या 13 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत नवीन राजकीय संघटना स्थापन केली आहे.
13 AAP Councillors Resign in Delhi
बंडखोर गटाचा दावा आहे की, त्यांच्यासोबत एकूण 15 नगरसेवक आहेत. यामुळे दिल्लीतील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत केलेल्या बंडाच्या धर्तीवरच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. आप पार्टीकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
आप पक्षाचे राजीनामा देणारे नगरसेवक
- हेमनचंद गोयल
- दिनेश भारद्वाज
- हिमानी जैन
- उषा शर्मा
- साहिब कुमार
- राखी कुमार
- अशोक पांडेय
- राजेश कुमार
- अनिल राणा
- देवेंद्र कुमार
- हिमानी जैन
📌 महत्वाच्या बातम्या
- “तुला ब्लाउज काढावं लागेल”, दिग्दर्शकाच्या मागणीनं माधुरीला बसला धक्का
- “तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही”; जगाचा निरोप घेण्यापूर्वी लक्ष्याने काढली होती या खास दोस्तांची आठवण
- छगन भुजबळ यांच्याकडून खंडणीची मागणी करणाऱ्या बनावट ‘आयकर अधिकाऱ्याला’ रंगेहाथ अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





