Rajnath Singh | मोठी बातमी ! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

Rajnath Singh | नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेडा घातला होता. तर आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

बुधवारी (19 एप्रिल) राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये कमांडर कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. तसंच आज (20 एप्रिल) ते भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. मात्र, आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते आज या परिषदेत सहभागी होणार नाहीयेत. तसंच डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून सध्या त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात एका दिवसात 12,591 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तसंच देशात उपचार घेत असलेल्यांची संख्या 65,286 वर पोहोचली आहे. यामुळे अनेक राज्यांनी काही नियमावली लागू केलेली आहे. तर मुंबई महापालिकेने मास्क सक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-