Ajit Pawar । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. अशातच, आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्या (21 एप्रिल) होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबीर प्रसिद्धीपत्रकात अजित पवार याचं नावच नाहीये. त्यामुळे अजित पवारांचं नाव पत्रकात नसल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या उपस्थितीत विभागीय कार्यकर्ता शिबीर होणार आहे. पण या शिबीराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात अजित पवार यांचं नाव नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांचं प्रसिद्धीपत्रकात नाव नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. तसंच अजित पवारांचा उद्या पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वनियोजीत कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नसल्याचंही सांगण्यात येतंय.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करणार अशा स्वरूपाचं चर्चा राज्यात सुरू होत्या असे असताना स्वतः अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होत की, माझ्या बाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, आमदार मला कामानिमित्त भेटण्यासाठी आले होते. कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरविल्या जात असल्याचा अजित पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच राष्ट्रवादीत काम करत आहोत. बातम्यांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, मला आमदार कामानिमित्त भेटले दुसरा अर्थ नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले होत. यानंतर आता पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Coriander Seeds Water | उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Sachin Kharat | … म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण परत करावा; सचिन खरात यांची मागणी
- IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर
- Job Opportunity | डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्समार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज
- Sanjay Raut । “महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे का?” : संजय राऊत
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले