IPL 2023 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू आहे. या हंगामामध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीने आतापर्यंत पाच सामने खेळले आहे. पण त्यांना अद्यापही विजयाचा दरवाजा ठोठावत आलेला नाही. अशा परिस्थितीत संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघातील युवा गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर (‘This’ player of Delhi Capitals out of the tournament)

आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच सामने खेळले आहे. या सर्व सामान्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. अशात संघाचा युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti) संघातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला, असल्याची माहिती मिळाली आहे.

पीटीआयच्या मते, दिल्ली कॅपिटल्सचा युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. कमलेशच्या जागी प्रियम गर्ग (Priyam Garg) आणि अभिमन्यू ईश्वर (Abhimanyu Ishwar) यांना चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. या दोनपैकी एकाला कमलेश नागरकोटीच्या जागी संघात जागा मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएल (IPL 2023) मध्ये कमलेश नागरकोटी याने आतापर्यंत 12 सामने खेळले आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करत 13 धावांमध्ये दोन बळी घेतले आहे. 9.5 च्या इकॉनोमीसह त्याने या विकेट्स घेतल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button