Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी एरंडेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Circles | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतांश लोकांना डोळ्याखालील काळ्या वर्तुळांच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही, त्यांना देखील काळी वर्तुळे येतात. काळ्या वर्तुळाच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या क्रीम आणि लोशनचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा (Castor oil) वापर करू शकतात. एरंडेल तेलामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यास मदत करतात. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने एरंडेल तेलाचा वापर करू शकतात.

एरंडेल तेल आणि गुलाब जल (Castor oil and rose water For Dark Circles)

डोळ्याखालील काळ्या वर्तुळाच्या समस्येवर मात करण्यासाठी एरंडेल तेल आणि गुलाब जल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एरंडेल तेल आणि गुलाब जल एकत्र मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर लावून ठेवावे लागेल. साधारण पंधरा मिनिटानंतर तुम्हाला ती जागा पाण्याने स्वच्छ करावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने हायपरपिगमेंटेशनची समस्या दूर होते.

एरंडेल तेल आणि दूध (Castor oil and milk For Dark Circles)

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी एरंडेल तेल आणि दूध फायदेशीर ठरू शकते. दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळून येते. लॅक्टिक ऍसिडमुळे काळ्या वर्तुळांचा रंग फिकट होण्यास मदत होते. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्हाला एरंडेल तेल आणि दुधाचे मिश्रण कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लावावे लागेल. साधारण पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमची त्वचा पाण्याने धुवावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने डाग सर्कल सहज दूर होऊ शकतात.

एरंडेल तेल आणि बदाम तेल (Castor oil and almond oil For Dark Circles)

एरंडेल तेल आणि बदाम तेलाच्या मदतीने डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर केली जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला बदाम तेल आणि एरंडेल तेल समान प्रमाणात एकत्र करू मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लावावे लागेल. बदाम तेलामध्ये आढळणारे गुणधर्म डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर तुम्ही एरंडेल तेल आणि बदाम तेलाचा वापर करू शकतात.

एरंडेल तेल वापरताना काळजी घ्या (Be careful when using castor oil)

एरंडेल तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. एरंडेल तेलाचा कधीही थेट वापर करू नये. कारण ते खूप घट्ट असते. एरंडेल तेल पाण्यात किंवा इतर कोणत्याही तेलात मिसळल्यानंतरच त्याचा वापर करा. डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर उपचार करण्यासाठी हे तेल वापरताना डोळ्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या तेलाला डोळ्याच्या आतील आवारापासून दूर ठेवा.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Gulakand Benefits)

पोटासाठी गुलकंदाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. गॅस, अपचन, बद्धकोष्टता, पोट सुजणे, पोट दुखी या समस्यांवर मात करण्यासाठी गुलकंदाचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. गुलकंद खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोट निरोगी राहते.

शरीर थंड राहते (The body remains cool-Gulakand Benefits)

गुलकंदाचा प्रभाव थंड मानला जातो. गुलकंदाचे नियमित सेवन केल्याने शरीर हायड्रेट आणि फ्रेश राहते. उष्णतेमुळे होणारी जळजळ शांत करण्यासाठी गुलकंद प्रभावी ठरू शकते. दररोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने थकवा, अशक्तपणा, शरीर दुखी यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या