Coriander Seeds Water | उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Coriander Seeds Water | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक भारतीय स्वयंपाक घरात धने वापरले जातात. धन्याचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते. त्याचबरोबर यामध्ये आयरन, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. धन्याचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उष्माघाताच्या समस्येवर मात करण्यासाठी धने उपयुक्त ठरू शकतात. धन्यासोबतच धन्याचे पाणी देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

लघवीची जळजळ कमी होते (Urinary inflammation is reduced-Coriander Seeds Water Benefits)

उन्हाळ्यामध्ये अनेकांना लघवी करताना जळजळ होते. धन्याच्या पाण्याचे सेवन केल्याने लघवी करताना होणारी जळजळ दूर होऊ शकते. त्याचबरोबर या पाण्याचे सेवन केल्याने लघवीशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही धन्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

पित्त शांत होते (Pitta calms down-Coriander Seeds Water Benefits)

उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना गरम वातावरणामुळे पित्ताचा त्रास व्हायला लागतो. यामध्ये ऍसिडिटी, खाज येणे, डोके दुखी इत्यादी समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी धन्याचे पाणी उपयुक्त ठरू शकते. या पाण्यामध्ये आढळणारे गुणधर्म पित्त शांत करण्यास मदत करतात.

पोटातील जळजळ कमी होते (Stomach inflammation is reduced-Coriander Seeds Water Benefits)

उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी रोज प्यायल्याने पोटात होणारी जळजळ शांत होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये गरम किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अनेकांना पोटात आणि छातीत जळजळ होते. ही जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही धन्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात. या पाण्याचे सेवन केल्याने पोटातील उष्णता बाहेर पडते आणि थंडावा मिळतो.

उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

एरंडेल तेल आणि गुलाब जल (Castor oil and rose water For Dark Circles)

डोळ्याखालील काळ्या वर्तुळाच्या समस्येवर मात करण्यासाठी एरंडेल तेल आणि गुलाब जल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एरंडेल तेल आणि गुलाब जल एकत्र मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर लावून ठेवावे लागेल. साधारण पंधरा मिनिटानंतर तुम्हाला ती जागा पाण्याने स्वच्छ करावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने हायपरपिगमेंटेशनची समस्या दूर होते.

एरंडेल तेल आणि दूध (Castor oil and milk For Dark Circles)

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी एरंडेल तेल आणि दूध फायदेशीर ठरू शकते. दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळून येते. लॅक्टिक ऍसिडमुळे काळ्या वर्तुळांचा रंग फिकट होण्यास मदत होते. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्हाला एरंडेल तेल आणि दुधाचे मिश्रण कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लावावे लागेल. साधारण पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमची त्वचा पाण्याने धुवावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने डाग सर्कल सहज दूर होऊ शकतात.

एरंडेल तेल वापरताना काळजी घ्या (Be careful when using castor oil)

एरंडेल तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. एरंडेल तेलाचा कधीही थेट वापर करू नये. कारण ते खूप घट्ट असते. एरंडेल तेल पाण्यात किंवा इतर कोणत्याही तेलात मिसळल्यानंतरच त्याचा वापर करा. डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर उपचार करण्यासाठी हे तेल वापरताना डोळ्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या तेलाला डोळ्याच्या आतील आवारापासून दूर ठेवा.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या