Prakash Ambedkar | MIM सोबतची युती का तुटली?; प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं कारण

Prakash Ambedkar | लातूर : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनीच आमच्याशी युती तोडली, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं. त्यामुळे वंचित आणि एमआयएमची युती का तुटली?, याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी ही युती का तुटली यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, “त्यांचा एक खासदार निवडून आल्यावर त्यांनी व्यवस्थित वाटाघाटी करायला हव्या होत्या. त्यांना विधानसभेला 100 जागा हव्या होत्या. त्यापेक्षा खाली येणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. 100 जागा देणं हे राजकीयदृष्ट्या चूक आहे हे आम्ही सांगत होतो. आम्ही सांगितलं एकत्र बसू. पण त्यांनी ऐकलं नाही.”

“वंचित आणि एमआयएम युतीला यश मिळालं म्हणजे आपली फार मोठी हवा झाली असं नाही हे सुद्धा सांगितलं. 35 ते 50 या दरम्यान आपल्या जागा निवडून येऊ शकतात. सभेला कितीही गर्दी झाली तरी. आपल्या तेवढ्याच जागा निवडून येऊ शकतात हे मी त्यांना सांगत होतो. तसेच येणाऱ्या सीट कोणत्या त्याही मी सांगायला तयार होतो. पण त्यांचा अट्टाहास 100चाच होता. ते राजकीयदृष्ट्या योग्य नव्हतं. त्यामुळे आम्ही वेगळे झालो”, असं आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button