Prakash Ambedkar | “सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धवजींनी दिला तर मानेल…”; प्रकाश आंबेडकर-राऊत यांच्यात जुंपली

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले. ‘शरद पवार हे भाजपचेच आहेत’ असा गंभीर आरोप केला होता. प्रकाश आंबेडकर यांचा याच वक्तव्यावरुन प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांच्यात जुंपली आहे.

संजय राऊतांनी दिलेल्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं. “मला उद्धव ठाकरेंनी सांभाळून बोला असे सांगितले असते तर तो मी सल्ला मानला असता“, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. .

आणखी काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“देशात कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु होऊ शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण कोणताही भारतीय एकमेकांचा शत्रु होऊ शकत नाही. दोन राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण शत्रुत्व अजिबात नाही. मनुस्मृतीच्या मुद्द्यावरुन आमचे भाजपसोबत टोकाचे मतभेद आहेत आणि ते राहतील. जर भाजपनं मनुस्मृतीची विचारधारा सोडण्याचा निर्णय घेतला तर आमचेही मतभेद टळतील”, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

‘शरद पवार भाजपसोबत’

‘शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्त्व्यानंतर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रया येत आहेत.

संजय राऊतांचा सल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केल्यानंतर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम करतात. “सध्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची  (Vanchit Bahujan Aghadi) युती झाली आहे. पुढील काळात ते महाविकास आघाडीचे घटक व्हावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु, असं होणार असेल तर त्यांनी या आघाडीचे जे प्रमुख स्तंभ आहेत त्यांच्यावर बोलू नये. प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेताना जपून शब्द वापरायला हवेत”, असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना दिला आहे.

‘त्या’ वक्तव्याचे स्पष्टीकरण

“इतिहासातील काही घटनांवरून मी ते वक्तव्य केले होते. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. भाजपला तुम्ही कमी लेखू नका. भाजप कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भांडणे लावणे, मतभेत निर्माण करणे हा भाजपचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असे भाजपला वाटते तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात”, अशी टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.