Share

Prakash Ambedkar | “…तर आम्ही भाजपसोबतही युती करू”; आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

🕒 1 min read Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्त्यव्य … Read more

Published On: 

🕒 1 min read

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्त्यव्य केलं आहे.

“कोणताही पक्ष हा एकमेकांचा राजकीय शत्रू सध्याच्या घडीला नाही. मतभेद असू शकतात, हे मतभेद टोकाचे ठरू शकतात. पण भाजपा आणि संघाने जर मनुस्मृतीची विचारधारा सोडली तर आम्ही त्यांच्यासोबतही बसायला तयार आहोत”, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

पुढे ते म्हणाले, “आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युतीसाठी विचार करू.”

दरम्यान, शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावरून देखील प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टीकरण देत भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, “इतिहासातील काही घटनांवरून मी ते वक्तव्य केले होते. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. भाजपला तुम्ही कमी लेखू नका. भाजप कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भांडणे लावणे, मतभेत निर्माण करणे हा भाजपचा फंडा आहे.”

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या