Ajit Pawar | पहाटेच्या थपथविधीबाबत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, त्यावर अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar | जालना :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली’ अशा अर्थाचे वक्तव्य जयंत पाटलांनी केल्यामुळे … Read more

Published On: 

Ajit Pawar | जालना :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

‘अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली’ अशा अर्थाचे वक्तव्य जयंत पाटलांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील नेतेमंडळींनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आणि आता स्वत: अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यामध्ये पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले असून हा सगळा प्रकार शरद पवारांच्या खेळीचा भाग असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर पुन्हा एकदा सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळल्याचे पाहायला मिळत आहे. “त्यावेळी मी स्वत: म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही