🕒 1 min read
पुणे – ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange protest ) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हाके (Laxman Hake ) यांनी स्पष्ट इशारा दिला की, “ज्या दिवशी जरांगे मुंबईत उपोषणाला बसतील, त्याच दिवशी आम्ही मालेगाव येथून मुंबईपर्यंत ओबीसींचा लाँग मार्च सुरू करू.”
हाके यांनी सांगितले की, मालेगाव येथील खंडोबा मंदिरात नारळ फोडून या लाँग मार्चची सुरुवात केली जाईल आणि राज्यभर ओबीसी समाजात जनजागृती करण्यात येईल. त्यांनी ओबीसी मतदारांना आवाहन केलं की, निवडणुकीत खोटे ओबीसी दाखले सादर करून उभे राहणाऱ्यांना दूर ठेवा आणि खऱ्या ओबीसी उमेदवारांनाच निवडून द्या.
Laxman Hake slams Ajit Pawar
हाके यांनी पवार कुटुंबावरही जोरदार हल्ला चढवला. “पवार कुटुंब जरांगे यांना रसद पुरवतं, आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जर त्यांचं कौतुक करत असतील, तर आम्हाला ते मान्य नाही. आता मुख्यमंत्री देखील ओबीसीच असायला हवा,” असं हाके म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना, हाके म्हणाले की, “ते अर्थ खात्यावर गोचिडासारखे चिटकले आहेत. ते सामाजिक दृष्ट्या असंवेदनशील असून, सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हेच त्यांचं तत्व आहे.” हाके यांनी अजित पवारांवर धनगर समाजाच्या निधीवर अडथळा आणल्याचा आरोप केला आणि जर ही तक्रार ऐकली नाही, तर राज्यातील पुढचा मुख्यमंत्री ओबीसीच ठरवणार आहे, हे लक्षात ठेवावे, असा इशाराही दिला.
हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका करत म्हटलं की, “जरांगे लोकशाहीचा अपमान करत आहेत. त्यांना ना ओबीसींचा आदर आहे, ना छगन भुजबळांचा.”
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय शिरसाटांचा संताप! “रात्रीची दारू उतरलेली नसेल…” राऊतांवर घणाघात
- “शिंदे आणि अजितदादा दोघंही संवादात कमजोर!” – फडणवीसांचा रोखठोक दावा
- ‘माझी औकात नाही, म्हणत कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना सुनावलं; राज्यात शो घेणार असल्याची घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








