Nitesh rane | “संजय राऊतांचे १० मिनटे पोलीस संरक्षण काढा”; सभागृहात नितेश राणे आक्रमक

Nitesh Rane | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ आहे, असं धक्कादायक विधान केलं आहे. त्याचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा लावून धरत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. त्यातच भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

Nitesh Rane react On Sanjay Raut

“रोज सकाळी उठून संजय राऊतांना ऐकायला लागतंय. महाराष्ट्राला याची गरज आहे का. आपण काय घेऊन खाल्ल आहे त्यांचं. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध? सामनाच्या आधी लोकप्रभाला असताना शिवसेनेच्या विरोधात अग्रलेख लिहत असायचे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लिहण्याचीही हिंमत केली होती. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचं पटत नसल्याचंही संजय राऊतांनी लिहलं होतं”, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे संजय राऊतवर आक्रमक (Nitesh Rane Aggressive on Sanjay Raut)

“सरकारी पोलीस संरक्षण घेऊन फिरत आहे. संजय राऊतांचे 10 मिनटे पोलीस संरक्षण काढा. परत सकाळी ते दिसणार नाहीत”, असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांबद्दल बोलताना त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

“संजय राऊत यांनी केवळ महाराष्ट्राचा अपमान केला नाही तर महाराष्ट्र द्रोह केला आहे. उद्या कुणीही सभागृहातील सदस्यांना काहीही म्हणेल. त्यामुळे आताच जरब बसणे आवश्यक आहे”, असं आशिष शेलार म्हणाले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेलार यांचं समर्थन केलं. तर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांच्या विधानाशी असहमत असल्याचं सांगितलं. त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचं दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-